SHRI AMBADEVI SANSTHAN, AMRAVATI



NEWS AND EVENTS CONDUCTED IN LIBRARY




१४ एप्रिल २०२५ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती


श्री.अंबादेवी संस्थान ग्रंथालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थानचे सचिव -डॉ.जयंत पांढरीकर,ग्रंथालय अध्यक्ष-श्री.सुरेंद्र बुरंगे,ग्रंथालय सचिव-सौ.दिपाताई खांडेकर यांच्या हस्ते दिप्रज्वलन करण्यात आले.

तसेच डॉ.जयंत पांढरीकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हारार्पण करण्यात आले. डॉ.पांढरीकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अफाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी अतिशय परिश्रम घेवून संविधान लिहिले.

अशा या महामानवास विनम्र अभिवादन व आदरांजली. यावेळी ग्रंथपाल-डॉ.रोहिणी पंडित,सहा.ग्रंथपाल- सौ.वीणा बोके, लिपिक-सौ.सुजाता साखरकर, नारायणराव, तृप्ती जोशी,श्री.प्रदीपजी अंदूरकर,

श्री.प्रवीण डांगे,श्री.माहोरकर, स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्षातील विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते





















४ मे २०२५ भव्य चित्रकला स्पर्धा


श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालय हे विविध उपक्रम घेण्यात अरेसार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री अंबादेवी संस्थान व फुलोर अकॅडमी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार-४ मे २०२५ रोजी करण्यात आले यावेळी स्पर्धेमध्ये विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

अमरावतीकराना परिचित फुलोर अकॅडमीचे संचालक श्री.पियुष जोशी यांनी इयत्ता १ ते ४ “अ” गट अशा तसेच इयत्ता ५ ते ७ “ब” गट अशा दोन गटात ही स्पर्धा संस्थानच्या कीर्तन सभागृहाच्या भव्य वस्तुत घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थानचे सचिव डॉ.जयंत पांढरीकर उपस्थित होते.यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अँड.दीपक श्रीमाळी,कोषाध्यक्ष- श्री.विलास मराठे ग्रंथालय अध्यक्ष- श्री.सुरेंद्र बुरंगे,ग्रंथालय सचिव-सौ.दिपाताई खांडेकर ,अँड.पांडे श्री पियूष जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.बुरंगे यांनी केले.एकूण १५० मुलामुलींनी सहभाग नोंदविला अनेक मुलांच्या पालकांनी उप्स्थ्त राहून मुलांचा उत्साह वाढविला.

आरंभी फुलोर अकॅडमीचे संचालक श्री पियुष जोशी यांनी उत्तम चित्र निवडण्यापूर्वीचे त्यांचे धोरण,वेळेत चित्र पूर्ण करणे,दिलेलेई जागा पुरेपूर वापरणे,चित्रातील आकृत्यांची प्रमाणबद्धता ,रंग भरतांना घ्यावयाची काळजी हे निकष तर सांगितलेच पण मुलांना चित्रकलेविषयी थोडक्यात मार्गदर्शनही केले.

यानंतर लगेचच स्पर्धानिर्णय जाहीर करण्यात आला.व मंचावरील उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

गट “अ” प्रथम बक्षीस – जानव्ही कोराट -वर्ग ४ , द्वितीय बक्षीस-आर्ध्या सुधीर धोत्रे- वर्ग-४, तृतीय बक्षीस अन्विता अनुप पुरोहित -वर्ग पाचवा, प्रोत्साहनपर बक्षीस-अमृता दलाल-वर्ग दुसरा, स्वानंदी महल्ले वर्ग दुसरा,

गट “ब” प्रथम बक्षीस हर्शिका अजय भगत वर्ग सातवा ,द्वितीय बक्षीस-जिगीषा सुशील गुडदे -वर्ग सहावा,तृतीय बक्षीस वेदांत विशाल वाकोडे वर्ग सातवा, प्रोत्साहनपार बक्षीस आराध्या हरीश लांडगे वर्ग सातवा,श्रुतिका गजानन लान्द्गेवर्ग सातवा.

दोन्ही गटात प्रथम आलेल्या विद्यार्थिनी ह्या दोन्ही गटात प्रथम आलेल्या विद्यार्थिनी ह्या मोतीनगर,अमरावती येथील राधेय आर्ट क्लासेस{ सुवर्णा बांगडे} च्या विद्यार्थिनी आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना चित्र कलेचे पुस्तक,रंग बॉक्स व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ.रोहिणी पंडित यांनी केले. यावेळी लिपिक सौ.सुजाता साखरकर,तृप्ती जोशी,नारायणराव,माहोरकर उपस्थित होते.






दि.१२ ऑगस्ट२०२५ डॉ. एस.आर.रंगनाथन जयंतीनिमित्त व्याख्यान


दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस आर.रंगनाथन यांची जयंती मंगळवर दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थानचे सचिव श्री.रवींद्र कर्वे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पदी कोषाध्यक्ष श्री.विलास मराठे तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ.मिलिंद अनासने ( ग्रंथपाल, एच.व्ही.पी.एम.अभियांत्रिकी व तांत्रीकी महाविद्यालय,अमरावती) लाभले

तसेच यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र बुरंगे व विश्वस्त अॅड.राजेंद्र पांडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.मा.श्री.रविंद्र कर्वे यांचे स्वागत श्री.बुरंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन

तसेच मा.श्री.विलास मराठे यांचे स्वागत श्री बुरंगे यांनी केले’ कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचे स्वागत शाल,श्रीफळ,अंबादेवी फोटो.जागृत दैवत पुस्तक देऊन ग्रंथालय अध्यक्ष श्री.सुरेंद्र बुरंगे यांचे हस्ते करण्यात आला.

आपल्या भाषणामध्ये डॉ. अनासने यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाविषयी थोडक्यात माहिती दिली. डॉ.एस आर.रंगनाथन यांनी C.lib, M.lib,P.H.D.सारखे कोर्स त्यांनी सुरू केले. भारत सरकारनी त्यांना सन १९५२ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले.ग्रंथालयातील सर कर्मचारी व ग्रंथपाल यांना या महापुरुषामुळे सन्मान मिळाला त्यांना त्रिवार अभिवादन. यावेळी ग्रंथालयातील सर्व कर्मचारी वर्ग- डॉ.पंडित सौ.बोके,सौ.साखरकर, जोशी. नारायणराव, माहोरकर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्रंथपाल डॉ.रोहिणी पंडित यांनी केले.




२० ऑगस्ट २०२५ संत सेना महाराज जयंती


श्री.संत साहित्य अध्ययन केंद्र व श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीवर आधारित विचारप्रवर्तक चर्चासत्र शुक्रवार दि. २०/०८/२०२५ रोजी आयोजित करण्यात आले. श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा.श्री. श्यामबाबा निचित यांनी केले.

प्रा.श्री. सुभाषजी लोहे संयोजक संत साहित्य अध्ययन म.रा.प्रा.श्री.श्यामबाबा निचित ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र बुरंगे, श्री.माणिकराव वेलूरकर,श्री.गजानन धानोरकर,श्री.प्रमोद गंगात्रे,प्रा.अंकुश मानकर,ह.भ.प.गजानन वायकर,श्री.राजेश राठोड,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या चर्चासत्रामध्ये,श्री.संजय आजनकर,श्री.बंडूभाऊ कुकटकर,श्री.जय जोह्गीया ,श्री.विनोद रामेकर,श्री.राहुल कळसकर,श्री.राजाभाऊ रामेकर,श्री.अरुण रामेकर,श्री.कार्तिक हिरुळकर,श्री.चेतन धानोरकर,श्री.गजानन रामेकर,श्री.किशोरराव रामेकर,श्रीमती सुनिता वरणकर,डॉ.रोहिणी पंडित,सौ.वीणा बोके,श्री.गजेद्र धजेकर,श्री.विजय राव,श्री.दीपक माथुरकर,श्री.सुनिल नांदुरकर,श्री.घनश्याम राजनकर उपस्थित होते.

अशा अनेक संत साहित्यावरील अभ्यासकांनी सहभाग घेऊन श्री संत सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत आपले मत व्यक्त करतांना मार्गदर्शन केले. श्री.संत सेना महाराज व श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्रावर प्रा.सुभाषजी लोहे यांनी त्यांचे विचार मांडले.तसेच ८अभ्यासकांनी या विषयायवर आपआपली मते व्यक्त केली. हरीभक्त-प्रभाकर महाराज राऊत यांनी श्री.संत सेना महाराजांचे सामजिक योगदान सगळ्यांना पटऊन दिले.

| जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती |
देह कास्त्विती परोपकारे||संत तुकाराम महाराज ||
संत महात्मे जगाच्या कल्याणा करता अवतार घेतात.
आपले संपूर्ण जीवन परोपकराकरता अज्ञानी जीवाकरिता आपला देह झिजवतात हेच खऱ्या संतांच वैशिटय,

संत मालिके पैकी श्री.सेना महाराजांनी सर्वच समाजाकरिता आपल जीवन चंदनासारख झिजवल.म्हनुनच त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहो व करीत राहू.

त्या निमित्यानी त्याचं पुण्यस्मरण,चिंतन,त्यांच्या वाग्मयाच मंथन म्हणून चर्चासत्रात आयोजन मोठ्या थाटाने करत आहो.

संतानी संपूर्ण मानवाकरिता ग्रंथसंपदा,लिहून ठेवली त्यांनी विविध विषयांवर,मराठी अभंग,हिंदी अभंग,त्यात ईशचिन्तन,कृपा याचना,विठ्ठल दर्शन,विठ्ठल वर्णन,सदगुरू गौरव,संतसमागम,क्षेत्रमहिमा,नामकीर्तन,भक्तीभाव,प्रपंच परमार्थ,कर्मयोग,हितोपदेश,नितीबोध,आत्मकथन,पाळणे,गवळणी,आरत्या व इतर अंतिम ध्येय साधन्याकरिता विविध प्रकारची रचना,समाधानी अन्तर्मुख व्हाव ह्या करता त्यांनी फार मोठ ‘योगदान’ ग्रंथ रूपाने आपल्या करता दिले अशाप्रकारे संतानी त्यांच्या अनुभवातून वाग्मय रूपांनी समाजाकरता फार मोठ योगदान दिल. न्यून ते पुरते,अधिक ते सरते, घ्यावया विनविते तुम्हा एसे...

तसेच श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांचा भक्ती मार्ग एरवी तरी माझिया भक्ता | आणि संसाराची चिंता | काया समर्थांची कंटा कोरान्न मागे| ज्ञानेश्वरी |
सर्वच संसाराची चिंता करतात,भक्तांनी कोणतीही चिंता करू नये,ज्याप्रमाणे श्रीमंताच्या घरी त्यांच्या घरातल्या लोकांना भिक मागण्याचा प्रसंग येतो का? त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे जे भक्त आहेत ते त्यांच्या कुटुंबापैकिच आहेत.असे ते समजतात,ते म्हणतात माझ्या भक्तावर कोणतेही संकट आले.त्याच निवारण करण माझ कर्तव्य आहे,माझे भक्त जन्म-मृत्यूच्या लाटेमध्ये बुडत आहे.असे पाहून महाराजांना कसतरी होत आहे.


बुडता हे जन,न देखवे डोळा,येतो कळवळा म्हणोनिया || फक्त आवश्यकता आहे चित्त-वृत्ती वाहण्याची हाच भक्तिमार्ग ज्ञानेश्वर महाराजांना प्रिय आहे. चित्त शुद्ध तरी | शत्रू मित्र होती| व्याघ्रन्खाती | सर्वतया ||

भक्तीचे प्रकार नऊ:श्रवण,किर्तन,नामस्मरण,पादसेवन,अर्चन,वंदन,दास्य,सख्यआत्म निवेदन, जन्म प्राप्त झाल्यानंतर सर्वच भक्ती करून आत्मनिवेदन भक्ती पर्यंत पोचायचे आहे. त्याकरिता ज्ञानदेवांनी हा भक्तिमार्ग सांगितला आहे.















Copyright © Shri Ambadevi Sansthan
Designed By Pawgi Infotech Services